मालवण | पळसंब : गांवात कला, क्रीडा, संस्कृती जपण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री जयंती देवी सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील उटणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जयंती मंदिर येथून करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी गावात उटणे वाटप कार्यक्रमाचे गावातून कौतुक केले जात आहे. सामाजिक जडण घडणीत भविष्यात मंडळाचे गावासाठी मोठे योगदान असेल
अनेक सामाजीक उपक्रमाने प्रत्येक कुटुंब मंडळाशी जोडले जावे हाच मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार श्री. वैभव परब, अमित पुजारे,बबन पुजारे, शेखर पुजारे,अक्षय परब,हितेश सावंत आजीव सभासद पदाधिकारी,भजन मंडळाचे बुवा अनिल परब, मधुकर परब, जीजी सावंत, दिवाकर पुजारे,कमलेश साटम, दत्तगुरू परब, मंदार सावंत, वेदांत सावंत, सोमा परब, सिद्धार्थ परब, अथर्व गोलतकर, सौरभ परब, तुषार पुजारे, नितेज सावंत, तनय सावंत आदी तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.