आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर करुन दिल्याची माजी नगरसेवक मंदार केणींची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील धुरीवाडा कासवकर स्मशानभूमी सुशोभीकरण कामचे भूमिपूजन ज्येष्ठ शिवसैनिक लीलाधर सावबा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर करुन दिलेला शब्द पूर्ण केला यासाठी नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका दर्शना कासवंकर, भाई कासवकर यांनी प्रयत्न पाठपुरावा केला अशी माहिती देण्यात आली.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, भूषण कासवकर, पद्माकर पराडकर, राजू सावंत, महेश सावंत, गोविंद खोर्जे, विनायक मणचेकर, साई वाघ, सुशील तारी, वाघ, दादा जोशी, विलास वेंगुर्लेकर, ग्रेसीस फर्नांडिस, नाना सारंग, कुणाल वेंगुर्लेकर, बबन वेंगुर्लेकर, बाबू वेंगुर्लेकर, विलास जोशी, प्रकाश खोर्जे, किरण जोगी, राकेश वेंगुर्लेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. धुरीवडा ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक व पाठपुरावा केलेल्यांचे आभार मानले