देऊळवाडा नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स बसविणे कामाचे ज्येष्ठ नागरीक शिवाजी म्हापणकर यांच्या हस्ते उद्घाटन.
देऊळवाड्यातील नागरीकांनी मानले आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांचे आभार.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिर ते श्री देव रामेश्वर मंदिर दरम्यान मार्गावर पेवर्स बसविणे या कामाचे उद्घाटन संपन्न झाले. देऊळवाड्यातील प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक श्री. शिवाजी म्हपणकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.
या विकासकामासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुहास वालावलकर मनोज मोंडकर, पूनम चव्हाण, उमेश चव्हाण. नीना मुबकर, मोहन मराळ यांनी प्रयत्न केले होते.
यानेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी प्रसाद आडवणकर, गणेश चव्हाण, रानडे भूषण म्हापणकर, अक्षय उर्फ गोपी मालवणकर, घाडी, किशोर गांवकर, गोलतकर आणि देउळवाड्यातील नागरिक उपस्थित होते.