29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट स्वामी महाराज वटवृक्ष मंदिरास भेट.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : देशभरात स्वामी भक्तीची परंपरा ही सर्व स्तरावरून प्रचलित होत आहे. स्वामींनी प्रत्यक्षात देत असलेल्या प्रचितीमुळे ही परंपरा स्वामी समर्थांच्या देह वास्तव्यापासून पासून चालत आलेली परंपरा आहे. आज जगभरासह देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक स्वामी भक्तीची ही परंपरा अव्याहतपणे सांभाळत आहेत. या अनुशंगाने स्वामी भक्तीच्या अविष्काराची ही परंपरा म्हणजे देेशभरातील स्वामी भक्तांसह माझ्याही आध्यात्मिक जीवन घटकाचा अविष्कार असल्याचे भावोद्गागार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

अक्कलकोट दौऱ्यावर आले असताना येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक निस्सीम स्वामीभक्त या नात्याने ज्या ज्या वेळी अक्कलकोटला येण्याची संधी लाभते त्यावेळी स्वामींचे दर्शन होईल या स्वामी भक्तीच्या वैचारिक आनंदाने मन गहिवरून येत असल्याचे विशेष स्पष्टीकरण केले. तसेच जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी तालुक्याचे भाजपा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, सुभाष बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार, राम सातपुते, समाधान अवताडे,
तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलनदादा कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, प्रा.शिवशरण अचलेर, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रवी मलवे, सागर गोंडाळ आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!