चिवला बिच येथील रापण संघांचे व मच्छिमार बांधवांचे मदतीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मालवणातील चिवला बिच या समुद्र किनारच्या रापणसंघ व मच्छिमार बांधवांना सध्या रोज जाळी फाटून नुकसान होण्याचा अनुभव येत आहे. रापण संघांच्या बांधवांकडून याबाबत तिथल्या खोल समुद्राच्या वाळूत एखादी टोकेरी, लाकूड सदृश्य वस्तू किंवा एखादा नांगर रुतून बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत जलतरण तज्ञ, प्रशासन किंवा स्कुबा डायविंग तज्ञांनी सहकार्य करायचे विनंती आवाहन चिवला बिच येथील मच्छिमार श्री विश्वजित गुरु मणचेकर ९७६४५९३८७३ यांना संपर्क साधायचे विनम्र आवाहन केले आहे.