31.3 C
Mālvan
Saturday, May 10, 2025
IMG-20240531-WA0007

आकेरीतील अपघातात उदयोन्मुख व्हेटर्नरी डाॅक्टरचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी – आंबेडकरनगर येथील किशन केशव पिंगुळकर (वय २१ वर्षे) या यवकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे बसलेले श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला. दिवंगत युवक किशन पिंगुळकर याला गोवा बांबुळी येथे हलविण्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज असताताना एकही ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या नवयुवकाला प्राण गमवावे लागले. याबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आकेरी येथे जुनी कोका कोला कंपनी समोरच्या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी हा अपघात रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमाराला घडला. दिवंगत किशन केशव पिंगुळकर हा आपला शेजारी श्रीराम पांडुरंग केळुस्कर यांच्यासह कोलगाव-सावंतवाडी येथून त्याच्या मोटारसायकलने (क्र. MH-O7-AE- 2019) पिंगुळीला आपल्या घरी जात असताना. आकेरी घाटात त्याची मोटारसायकल स्लिप होऊन मोटार सायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अत्यवस्थ असलेल्या किशनला आणि जखमी झालेल्या श्रीराम याना सावंतवाडी येथीलरुग्णालयात हलविण्यात आले. पण किशन खूप अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. पण जिल्हयातील दोन्ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहाटे चार वाजता किशन केशव पिंगुळकर याची प्राणज्योत मालवली.

या अपघाताची खबर पिंगुळी येथील देवेंद्र पिंगुळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रवींद्र भांड अधिक तपस करत आहेत.

दरम्यान किशन हा नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झाला होता. पिंगुळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ-बहीण, काका-काकू असा परिवार आहे. किशन हा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचे सुपुत्र होत. डाॅ. किशनच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी - आंबेडकरनगर येथील किशन केशव पिंगुळकर (वय २१ वर्षे) या यवकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे बसलेले श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला. दिवंगत युवक किशन पिंगुळकर याला गोवा बांबुळी येथे हलविण्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज असताताना एकही ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या नवयुवकाला प्राण गमवावे लागले. याबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आकेरी येथे जुनी कोका कोला कंपनी समोरच्या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी हा अपघात रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमाराला घडला. दिवंगत किशन केशव पिंगुळकर हा आपला शेजारी श्रीराम पांडुरंग केळुस्कर यांच्यासह कोलगाव-सावंतवाडी येथून त्याच्या मोटारसायकलने (क्र. MH-O7-AE- 2019) पिंगुळीला आपल्या घरी जात असताना. आकेरी घाटात त्याची मोटारसायकल स्लिप होऊन मोटार सायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अत्यवस्थ असलेल्या किशनला आणि जखमी झालेल्या श्रीराम याना सावंतवाडी येथीलरुग्णालयात हलविण्यात आले. पण किशन खूप अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. पण जिल्हयातील दोन्ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहाटे चार वाजता किशन केशव पिंगुळकर याची प्राणज्योत मालवली.

या अपघाताची खबर पिंगुळी येथील देवेंद्र पिंगुळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रवींद्र भांड अधिक तपस करत आहेत.

दरम्यान किशन हा नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झाला होता. पिंगुळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ-बहीण, काका-काकू असा परिवार आहे. किशन हा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचे सुपुत्र होत. डाॅ. किशनच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!