27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

१०० विद्यार्थ्यांनी १००० वाचक निर्माण करुन कट्टा पंचक्रोशी वाचकांची नगरी बनवावी…!

- Advertisement -
- Advertisement -

बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा येथे कै. भाऊ गुराम स्मृती दिनानिमित्त आयोजीत स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात हि. बा. वरस्कर विद्यामंदिर, वराड प्रशालेच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रिया मयेकर यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे कै. भाऊ गुराम यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘पुस्तकाने मला काय दिले’, या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोज काळसेकर यांनी या स्पर्धेचा आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि कै. भाऊ गुराम यांच्या पुण्यतिथी दिवशी श्री दिलीप रामचंद्र गुराम यानी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या आरंभी कै. भाऊ गुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री. किशोर शिरोडकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते.

या वेळी वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी वाचन संस्कृती बाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण करावी या बाबत मार्गदर्शन केले. सौ. हि. बा. वरस्कर विद्यामंदिर, वराड प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया मयेकर यांनी वाचनाचे प्रकार, मराठी व्याकरण तसेच विद्यार्थिनी कोणती पुस्तके वाचावीत या बाबत मार्गदर्शन केले. श्री.विलास वाईरकर(माजी उपप्रमुख निरीक्षक, बृ. मुंबई )
यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री.राजेंद्र पवार (DGM एअर इंडिया) यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल चे तोटे व पुस्तकांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.
ऍड. देवेन पटेल (हाय कोर्ट मुंबई) यांनी कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल तर पुस्तके आणि वाचन किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले.

श्री. किशोर शिरोडकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर ‘पुस्तकाने मला काय दिले’ या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत
१०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन व साने गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तके वाचनासाठी दिली होती. त्या पुस्तकातून ‘मला काय गवसले’, हे मुलांनी २०० शब्दात लिहून स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत मोठ्या गटा कु. स्वरा अर्जून पेंडूरकर खरारे, हिने प्रथम क्रमांक तर लहान गटात
कु. पलक पराग महाभोज, गुरामवाडीहिने प्रथम क्रमांक
पटकावला

लहान गट : द्वितीय क्रमांक साई राज शंभू परुळेकर (वराड),
मधूर अर्जून पेंडूरकर (खरारे),
तृतीय क्रमांक त्रिशा देवदास रेवडेकर (कट्टा), उत्तेजनार्थ
यशिका देवू पालव ,(वराड), जान्हवी संतोष नांदोसकर (नांदोस), गिरीजा राजेंद्र नाईक (कुणकवळे).

मोठा गट : द्वितीय क्रमांक सोहम सूर्यकांत गावडे (कट्टा);
तृतीय काव्य विनोद दळवी (ओरोस), वैष्णवी संदीप गोळवणकर (गोळवण),

उतेजनार्थ :
प्रणित सूर्यकांत शिंदे (वराड),
वृषभ दतात्रय टेमकर वराड
गायत्री गणेश साळुंके (पेंडूर),
राशी सत्यवान चव्हाण (चौके),
धनश्री आनंद बाक्रे (वराड),
ईश्वरी उत्तम पाताडे (कट्टा),
वेदिका प्रमोद तेंडोलकर (कट्टा),
पायल फुलाराम देवासी (कट्टा).

सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आली.

या कार्यक्रमावेळी मुख्या. देवयानी गावडे, मुख्या. सौ. प्रिया मयेकर श्री. विलास वाईरकर (माजी उपप्रमुख निरीक्षक, बृहन मुंबई ), श्री. राजेंद्र पवार (DGM येअर इंडिया), ऍड. देवेन पटेल (हाय कोर्ट मुंबई), श्री. किशोर शिरोडकर, श्री. बापू तळवडेकर, श्री. श्याम पावसकर, श्री. सुनील गुराम, काळसेकर सर श्री. बाळकृष्ण गोंधळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.जाभवडेकर यांनी केले.आणि श्री.बाळकृष्ण नांदोसकर यांची सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा येथे कै. भाऊ गुराम स्मृती दिनानिमित्त आयोजीत स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात हि. बा. वरस्कर विद्यामंदिर, वराड प्रशालेच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रिया मयेकर यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे कै. भाऊ गुराम यांच्या स्मृती दिनानिमित्त 'पुस्तकाने मला काय दिले', या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोज काळसेकर यांनी या स्पर्धेचा आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि कै. भाऊ गुराम यांच्या पुण्यतिथी दिवशी श्री दिलीप रामचंद्र गुराम यानी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या आरंभी कै. भाऊ गुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री. किशोर शिरोडकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते.

या वेळी वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी वाचन संस्कृती बाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण करावी या बाबत मार्गदर्शन केले. सौ. हि. बा. वरस्कर विद्यामंदिर, वराड प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया मयेकर यांनी वाचनाचे प्रकार, मराठी व्याकरण तसेच विद्यार्थिनी कोणती पुस्तके वाचावीत या बाबत मार्गदर्शन केले. श्री.विलास वाईरकर(माजी उपप्रमुख निरीक्षक, बृ. मुंबई )
यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री.राजेंद्र पवार (DGM एअर इंडिया) यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल चे तोटे व पुस्तकांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.
ऍड. देवेन पटेल (हाय कोर्ट मुंबई) यांनी कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल तर पुस्तके आणि वाचन किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले.

श्री. किशोर शिरोडकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर 'पुस्तकाने मला काय दिले' या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत
१०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन व साने गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तके वाचनासाठी दिली होती. त्या पुस्तकातून 'मला काय गवसले', हे मुलांनी २०० शब्दात लिहून स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत मोठ्या गटा कु. स्वरा अर्जून पेंडूरकर खरारे, हिने प्रथम क्रमांक तर लहान गटात
कु. पलक पराग महाभोज, गुरामवाडीहिने प्रथम क्रमांक
पटकावला

लहान गट : द्वितीय क्रमांक साई राज शंभू परुळेकर (वराड),
मधूर अर्जून पेंडूरकर (खरारे),
तृतीय क्रमांक त्रिशा देवदास रेवडेकर (कट्टा), उत्तेजनार्थ
यशिका देवू पालव ,(वराड), जान्हवी संतोष नांदोसकर (नांदोस), गिरीजा राजेंद्र नाईक (कुणकवळे).

मोठा गट : द्वितीय क्रमांक सोहम सूर्यकांत गावडे (कट्टा);
तृतीय काव्य विनोद दळवी (ओरोस), वैष्णवी संदीप गोळवणकर (गोळवण),

उतेजनार्थ :
प्रणित सूर्यकांत शिंदे (वराड),
वृषभ दतात्रय टेमकर वराड
गायत्री गणेश साळुंके (पेंडूर),
राशी सत्यवान चव्हाण (चौके),
धनश्री आनंद बाक्रे (वराड),
ईश्वरी उत्तम पाताडे (कट्टा),
वेदिका प्रमोद तेंडोलकर (कट्टा),
पायल फुलाराम देवासी (कट्टा).

सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आली.

या कार्यक्रमावेळी मुख्या. देवयानी गावडे, मुख्या. सौ. प्रिया मयेकर श्री. विलास वाईरकर (माजी उपप्रमुख निरीक्षक, बृहन मुंबई ), श्री. राजेंद्र पवार (DGM येअर इंडिया), ऍड. देवेन पटेल (हाय कोर्ट मुंबई), श्री. किशोर शिरोडकर, श्री. बापू तळवडेकर, श्री. श्याम पावसकर, श्री. सुनील गुराम, काळसेकर सर श्री. बाळकृष्ण गोंधळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.जाभवडेकर यांनी केले.आणि श्री.बाळकृष्ण नांदोसकर यांची सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!