मालवण पोलिस निरीक्षकांना निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : मालवणमध्ये घडलेल्या दुर्घटनेतील मृत महिलेला न्याय मिळावा व संशयीताला कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, असे मालवणच्या महिलांनी, २६ सप्टेंबर रोजी मालवण तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना एक निवेदन दिले होते. त्या संदर्भातील सोशल मिडियातील बातम्यांवर काही जणांनी आक्षेपार्ह कमेंट करुन महिलेची बदनामी केली आहे, असा आरोप करत त्या कमेंटसचे स्क्रीन शाॅट काढून या संदर्भात एक निवेदन पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना देण्यात आले आहे. या निवेदना सोबत कमेंटसच्या स्क्रीनशाॅटच्या प्रिंट जोडलेल्या असून या कमेंट करणाऱ्यांना तत्काळ अटक करुन शिक्षा करायची मागणी नागरीकांच्या सह्या असलेल्या निवेदनात आज २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.
मालवण पोलिस स्टेशन येथे, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, पल्लवी तारी, निनाक्षी मेथर, चारू आचरेकर, विद्या फर्नांडिस, फॅनी फर्नांडिस, मनिषा पारकर, महीमा मयेकर, अंजना सामंत आदींनी हे निवेदन मालवण पोलिस स्टेशन येथे सादर केले.