मालवण | प्रतिनिधी : पूर्वाश्रमीच्या पत्नीला पेट्रोल ओतून जाळून मारल्या प्रकरणी संशयीत सुशांत गोवेकर ( वय ४०) मालवण याला मालवण पोलिसांनी कुंभारमाठ येथून ताब्यात घेत अटक केली आहे. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी मालवण पोलिस अधिक तपास करत आहेत. आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८;३० वाजता ही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तत्पूर्वी मालवण पोलिसांनी, एका प्रेसनोटद्वारे संशयित सुशांत गोवेकर याचे छायाचित्र जारी करत तो कोणालाही आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते.