:
बांदा | राकेश परब : शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत ‘नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा संपन्न होणार आहे.
चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवीसाठी ‘सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणारी मुले’ हा विषय ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. रंग साहित्य विद्यार्थ्यांना सोबत घेऊन यायचे आहे. रंगभरण स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी या गटात होणार असून विद्यार्थ्यांना रंगवण्यासाठी चित्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रंग, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, सचिव राकेश केसरकर, शैलेश लाड मित्रमंडळाचे संदीप नार्वेकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले आहे.