चौके | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मालवण – चौके – धामापूर – कुडाळ’ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान वास्को – मालवण ही कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून कुडाळच्या दिशेने जाणारा टेंपो MH- 07 X – 1936 यांच्या मध्ये धडक बसून अपघात झाला. यामध्ये कदंबा बसची समोरील काच फुटली आणि दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही वाहनांचे चालक व बसमधील प्रवासी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
वास्को ते मालवण प्रवासी वाहतूक करणारी कदंबा बस आणि मालवण येथे सिमेंट वाहतूक करून माघारी परतत असणारा टेंपो यांच्या मध्ये येथील वळणाचा अंदाज वाहनचालकांना न आल्याने हा अपघात झाला असे समजते. काळसे पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली.