अध्यक्षपदाची धुरा पुनश्च अमित रावले यांच्याकडे तर सचिवपदी साईनाथ लाडगांवकर, खजिनदारपदी चेतन कदम व स्थानिक सचिवपदी राजेंद्र साटम बिनविरोध…!
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी- सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाच्या अध्यक्षपदी अमित रावले यांची फेरनिवड, तर सचिवपदी साईनाथ लाडगांवकर, खजिनदार चेतन कदम, व स्थानिक सचिवपदी राजेंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुखशांती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार ११ सप्टेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष अमित रावले यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आली. यावेळी मंडळाचे नूतन पदाधिकारी म्हणून अध्यक्ष अमित रावले, सचिव साईनाथ लाडगांवकर, खजिनदार चेतन कदम, स्थानिक सचिव राजेंद्र साटम, तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून सुजय कदम, समिर रावले,स्वप्निल गांवकर, प्रविण रावले,विशाल रावले,तेजस सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिव साईनाथ लाडगांवकर यांनी, आम्ही बोलून दाखविण्यापेक्षा विकास कामे व उपक्रम राबविणार आहोत असा विश्वास व्यक्त केला.