26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयीत जयदीप आपटे व चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी…!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुख्य संशयित आरोपी शिल्पकार जयदीप आपटे तसेच पोलीस कोठडीत असलेला अन्य संशयित आरोपी तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज गुरुवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळा उभारणी ठेकेदार शिल्पकार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील यालायापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे याचा शोध सुरु होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. बुधवारी रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वतीने बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणात आता पोलिस व संबंधीत यंत्रणा कठोर व निष्पक्ष कारवाई करत चौकशी करतील अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुख्य संशयित आरोपी शिल्पकार जयदीप आपटे तसेच पोलीस कोठडीत असलेला अन्य संशयित आरोपी तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज गुरुवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळा उभारणी ठेकेदार शिल्पकार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील यालायापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे याचा शोध सुरु होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. बुधवारी रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वतीने बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणात आता पोलिस व संबंधीत यंत्रणा कठोर व निष्पक्ष कारवाई करत चौकशी करतील अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!