29.3 C
Mālvan
Friday, May 9, 2025
IMG-20240531-WA0007

मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण! – आ.रविंद्र फाटक अक्कलकोट..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे प्रतिनिधी |

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अनेक स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर समितीचे इतर धार्मिक कार्यक्रमासोबत कार्यालयीन कामकाजाचे स्वरूपही ही सर्वोत्तम आहे. मंदिराशी निगडीत असलेल्या भाविकांना समितीच्या कार्यालयातून महेश इंगळे यांच्या सहकार्यातून नेहमीच उत्कृष्ट प्रतिसाद असतो. त्यामुळे मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण असल्याचे मनोगत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, हसापूरचे रहिवासी मेजर शिवपुत्र घटकांबळे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे प्रतिनिधी |

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अनेक स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर समितीचे इतर धार्मिक कार्यक्रमासोबत कार्यालयीन कामकाजाचे स्वरूपही ही सर्वोत्तम आहे. मंदिराशी निगडीत असलेल्या भाविकांना समितीच्या कार्यालयातून महेश इंगळे यांच्या सहकार्यातून नेहमीच उत्कृष्ट प्रतिसाद असतो. त्यामुळे मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज पारदर्शकतेने परिपूर्ण असल्याचे मनोगत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, हसापूरचे रहिवासी मेजर शिवपुत्र घटकांबळे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!