ओरोस | प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या नेहरु युवा केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यामध्ये १८ते २९वर्षे वयोगटातील युवा-युवतींसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहितकुमार सैनी यांनी दिली.
तालुकास्तरीय स्पर्धेतील स्पर्धकाचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेता येईल. जिल्हास्तरावरुन निवड झालेल्या स्पर्धकांचे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यात पात्र असणार आहे. ही स्पर्धा जिल्हा ते राष्ट्रीय पातळीपर्यंतची असल्याने स्पर्धकाला हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार आहे. स्पर्धेचा विषय ‘देशभक्ती एवं राष्ट्रनिर्माण मध्ये सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास’ हा स्पर्धेचा विषय राहणार असून, स्पर्धकास आठ ते दहा मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे. या स्पर्धेतमध्ये ज्या स्पर्धकांनी सन २०१५-१६ते २०१९-२०या कालावधीत आणि मागील वर्षी निवड झालेल्या स्पर्धकांना, सहभाग झालेल्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५हजार, २हजार, १हजार रुपये व गौरवपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तर राज्यस्तरावरुन अनुक्रमे २५हजार, १०हजार, ५हजार व गौरवपत्र देणार असून, राष्ट्रीयस्तरावर अनुक्रमे २लाख, १लाख, ५०हजार व गौरवपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध असून, शनिवार दि. २०नोव्हेंबर २०२१पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपला सहभाग पुढीलप्रमाणे नाव व भ्रमणध्वनी क्रमांकासाठी संपर्क साधावा. दोडामार्ग तालुका- गुरुदास लांबर ९४०४९९३४६१ व सोनाली धरणे ९४०४९३०६००, देवगड तालुका- रीना दुधवडकर ८४११८४१९४३ व सुजय जाधव ९३०७१३०६११, मालवण तालुका- अंकित जाधव ७७०९२३७२९९ व ऐश्वर्य मांजरेकर ९१५८१४०४००८, सावंतवाडी तालुका- विश्वजित जाधव ७५८८९६७३२४ व जयदिप मांजरेकर ९४२२८८५३८८, कणकवली तालुका- अक्षय मोडक ९४२२३७२०९७ व वर्षा केसरकर ९७६४८८३८१६, वैभववाडी तालुका- अतिश माईणकर ७३५०९६९९१९व श्रद्ध चव्हाण ८६६९२९६१४६, वेंगुर्ला तालुका- प्रथमेश पेडणेकर ८००७७६९८३४ व श्रीहर्षा टेंगशे ९४२१५१८३३७, कुडाळ तालुका- विल्सन फर्नांडिस ७०८३२७४८३४ व समीर वालावलकर ९४०३१६२४८१यांच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग येथील दूरध्वनी क्र. ०२३६२-२९५०१२ व भ्रमणध्वनी क्र. ९४२१२६७०११ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.