24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गरमा गरम चहा मिळवा शेतात; बांधावरच्या चहाची राज्यभर चर्चा, या चहावाल्याची भन्नाट आयडिया, डॉली चहावाल्याला विसरुन जाल

- Advertisement -
- Advertisement -

सौजन्य :- डिजिटल मीडिया

Bandhavarcha Chaha : डॉली चहावाला देशातच नाही तर जगात गाजत आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली. शेताच्या बांधावर गरमा गरम चहाची तलफ भागवणाऱ्या या चहावाल्याची चर्चा रंगली आहे.

आतापर्यंत आपण पिझ्झा-बर्गर आणि थंड पेय या सारखे खाद्य पदार्थ फोन वरुन मागितले असतील. परंतु धाराशिवच्या ग्रामीण भागातील तेरमध्ये एका चहावल्याने थेट बांधावरच्या चहाची भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. एक कॉलवर थेट शेताच्या बांधावर चहा देण्याची ही सेवा पंचक्रोशीत नावाजली आहे. ग्रामीण भागात शेतावर चहा मिळणे दुरापास्तच, पण या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागावली जात आहे. हा चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो. कोण आहे हा चहावाला आणि कसा आहे त्याचा स्टार्टअप?

महादेव माळी यांची भन्नाट आयडियाधाराशिवच्या तेर येथील महादेव नाना माळी हे गेली 2004 पासून चहाचा व्यवसाय करतात. चहाच्या व्यावसायात नवल काय असं कोणाला ही वाटू शकतं. पण महादेव माळी यांनी हॉटेलात चहा विकणे ही संकल्पनाच बदलून टाकली आहे .तिसरी पास असलेले महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात. ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात.

हा तर कष्टकऱ्यांचा चहा

त्यांच्या अभिनव संकल्पनेला या परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. शेतात मालक, शेतकरी, मजूर, कष्टकरी राब राबतात. या कष्टकऱ्यांचाच हा चहा आहे. त्याला खास चव आहे. माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक कॉल येतात. विशेष म्हणजे माळी यांना या आवाजाची इतकी ओळख झाली आहे की, कोणत्या शेतातून आणि कोणी फोन केला हे ते केवळ आवाजावरुन ओळखतात. ते फोन करणाऱ्याला नाव सुद्धा विचारत नाही. पण चहा वेळेवर पोहचतो.

तीन किलोमीटर परिसरात गरमा गरम चहा

तेर गावापासून तीन किलोमीटरच्या परिसरात त्यांचा हा व्यवसाय चालतो. सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कमीत कमी दोन हजार कप चहाची विक्री होते. मोटरसायकलवर शेतातील पायवाटा आणि नागमोडी वळणावरुन ते जातात आणि चहा पोहचवतात.

कोविड काळात सुचली आयडिया

कोविड काळात सर्वत्र बंदी होती. ग्रामीण भागात आणि शेतातील मंडळींना बाहेर पडणे अवघड होते. त्यावेळी महादेव माळी यांना शेताच्या बांधावर चहा नेऊन देण्याची आयडिया सूचली. तेव्हापासून ही सेवा सुरु आहे. दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहाची विक्री होते. त्यासाठी त्यांना रोज 50 ते 60 लिटर दूध लागते. तर इतर साहित्यपणे भरपूर लागते. या स्टार्टअपचे सगळीकडे कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!