बांदा : राकेश परब
पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व (कै.) विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार यांच्यावतीने कोंडूरा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
आठवी ते दहावी गटात श्रावणी आरोंदेकर, अस्मि मांजरेकर, मृदुला सावंत यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर तनुष्का मेस्त्री, साक्षी दळवी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. पाचवी ते सातवी गटात चिन्मय कोटणीस, निधी नाईक, सिद्धी खरात यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सोनल मुळीक, नैतिक मोरजकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. पहिली ते चौथी गटात सर्वज्ञ वराडकर, गायत्री शेणई, परि मोरजकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. देवयानी मुळीक, रुद्र शिंदे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व (कै.) विद्याधर शिरसाट स्मृतीप्रित्यर्थ चषक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व प्रा. मिलिंद कासार, दत्तगुरु कांबळी, श्री धामापूरकर, श्री बाभुळकर यांनी केले.
विजेत्यांना संतोष रेडकर, अर्जुन मुळीक, विश्वभर नाईक, अनिल नाईक, पत्रकार निलेश मोरजकर, आयोजक अमोल केसरकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी आरोस बाजार हायस्कुलचे श्री सावंत व श्री धूपकर या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.