बांदा : राकेश परब
नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शालेय गटात श्रुती शिवाजी पोपकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) तर खुल्या गटात सौ. रीना निलेश मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
शालेय गटात नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा) व क्लिंटन जॉन फर्नांडिस (दिव्य ज्योती हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. चेतना गजानन परब (दिव्य ज्योती हायस्कुल, बांदा) हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. खुल्या गटात रामचंद्र अर्जुन शिरोडकर (तळकट) व कृष्णा जनार्दन गवस (वाफोली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. जगन्नाथ शांताराम सातोसकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. मोर्ये कुटुंबियांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली.
दोन्ही गटात २० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस स्वरचित पावसाळी कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व कै. मोर्ये यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, प्रमुख पाहुणे प्रभाकर रामचंद्र गावस, संचालक शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, भाजपचा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राकेश केसरकर यांनी केले. प्रकाश पाणदरे यांनी (कै.) सुभाष मोर्ये यांच्या कार्याची ओळख करुन दिली. या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण महाबळेश्वर सामंत यांनी केले. सौ. श्वेता कोरगांवकर, प्रभाकर गांवस, अनंत भाटे, तुळशीदास धामापूरकर यांनी (कै.) मोर्ये यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार सचिव राकेश केसरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहसेक्रेटरी हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर तसेच अंकुश माजगावकर, गुरुनाथ नार्वेकर, नागेश सावंत, बांदा जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, जे. डी. पाटील, समीर सातार्डेकर, सौ. सुनिता गवस, सौ.अर्चना सावंत, सौ. रेश्मा सावंत, सौ. प्राची नार्वेकर, सुवर्णलता धारगळकर, पूजा कामत, सौ. सिया महाबळ, सौ. सुशांती सावंत, सौ. सरिता तर्फे तसेच पालक व शिक्षक यांच्यासह ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.