26.6 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

कासार्डे येथे शेतकऱ्यांना एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टकडून मोफत रेनकोट वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग : ५५ व्या बँक राष्ट्रीयकरण दिनाचे औचित्य साधत एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई ह्यांच्या हस्ते भात लावणी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. आस्था सावंत हिच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. अशाप्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन संजय देसाई यांनी केले.

यावेळी बोलताना संजय देसाई ह्यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करताना, भात लावणी प्रसंगी उपयोगी ठरणारे असे रेनकोट सर्व शेतकऱ्यांना एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टने पुरस्कृत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ट्रस्टचे आभार मानले. आपल्या छोटेखानी मनोगतमध्ये संजय देसाई यांनी, आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नमूद करताना अधिकाधिक समाजसेवी संस्थांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत यांनी केले. यावेळी एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त बी एस सावंत तसेच समाजसेवक पांडुरंग आडरेकर, जयेश सावंत, नंदकिशोर सावंत, गणेश वंजारे व उद्योजिका सौ. अदिती सावंत उपस्थित होते.

( निकेत पावसकर, प्रतिनिधी, कासार्डे, सिंधुदुर्ग. )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग : ५५ व्या बँक राष्ट्रीयकरण दिनाचे औचित्य साधत एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई ह्यांच्या हस्ते भात लावणी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. आस्था सावंत हिच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. अशाप्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन संजय देसाई यांनी केले.

यावेळी बोलताना संजय देसाई ह्यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करताना, भात लावणी प्रसंगी उपयोगी ठरणारे असे रेनकोट सर्व शेतकऱ्यांना एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टने पुरस्कृत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ट्रस्टचे आभार मानले. आपल्या छोटेखानी मनोगतमध्ये संजय देसाई यांनी, आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नमूद करताना अधिकाधिक समाजसेवी संस्थांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत यांनी केले. यावेळी एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त बी एस सावंत तसेच समाजसेवक पांडुरंग आडरेकर, जयेश सावंत, नंदकिशोर सावंत, गणेश वंजारे व उद्योजिका सौ. अदिती सावंत उपस्थित होते.

( निकेत पावसकर, प्रतिनिधी, कासार्डे, सिंधुदुर्ग. )

error: Content is protected !!