ब्युरो न्यूज : कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई – गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे.
या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग खालील प्रमाणे :
१) वाकण फाटा येथून भिसे खिंड -रोहा – कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
२) वाकण फाटा येथून पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली – रवाळजे – निजामपुर – माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग :
१) कोलाड येथून कोलाड – रोहा – भिसे खिंड – वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
२) कोलाड येथून रवाळजे – पाली वरून वळवून वाकण – पाली – खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) कोलाड येथून रवाळजे – पाली – वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.