कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर आणि मान्यवरांचे मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल कट्टा आणि डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे दहावी, बारावी, आणि पदवी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर म्हणाले की, ग्रामीण भागातील दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेले यश हे अनन्यसाधारण असेच आहे. शाळेचा निकाल हा प्रतिवर्षीप्रमाणे शंभर टक्के लागलाच परंतु नव्वद टक्केच्यावर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेवर यश मिळवीत उच्च पदापर्यंत जावे. आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकविण्याबरोबरच संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांची आहे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी येथे बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील डॉ नितीन देशपांडे,सौ राजलक्ष्मी देशपांडे, डॉ. प्रज्ञा अंजळ, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, केंद्रप्रमुख सावंत, श्रीमती सुतार, मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक हृषीकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी श्री अजयराज वराडकर यांनी वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. यामागे शिक्षकांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आहे. वराडकर हायस्कूलच्या यशाची पताका फडकविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनीही कटिबद्ध राहावे असे आवाहन केले तर सेक्रेटरी सुनील नाईक यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणगौरव करण्याचे मुख्य कारण हेच असते कि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यामधून प्रेरणा घ्यावी आणि आपलाही असा सत्कार व्हावा अशी मनातून इच्छा निर्माण व्हावी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आपण मिळविलेल्या यशाचे फळ मिळाले यासाठी सत्कार समारंभ आहे . यापुढेही प्रशालेच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही कार्यरत राहावे असे आवाहन केले यावेळी डॉ नितीन देशपांडे, सौ. राजलक्ष्मी देशपांडे यांचीही समयोचित भाषणे झाली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर आणि वीणा शिरोडकर यांनी केले. शेवटी पर्यवेक्षिका देवयानी गावडे यांनी आभार मानले.