मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. आप्पा लुडबे यांच्यावतीने त्यांच्या मालवण वायरी येथील निवासस्थानी , दि. २९ जून व ३० जून रोजी, दोन दिवस सकाळी ९. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत आधारकार्ड नोंदणी व इतर सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट तसेच दुरुस्ती करणे, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, आभा कार्ड काढणे, शेत पिक विमा काढणे यासह शेतकरी सन्मानची माहिती आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तरी गरजू व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी ९०२१६३४९६० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केले आहे.