पंढरपूर | ब्यूरो न्यूज : श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य कार्यशील व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांनी नुकतेच सहकुटूंब येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस भेट देऊन विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी श्रीशैल गवंडी व कुटुंबीयांचा पंढरीतील विठू माऊलीच्या गाभाऱ्यात व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालयात श्री विठ्ठलाचे कृपाप्रसाद गवंडी यांच्या स्वाधीन करुन गवंडी कुटूंबियांचा सन्मान केला.

याप्रसंगी पुरोहीत केशव उत्पात, गणेश राजपुरे, बबनराव राजपुरे आदींसह गवंडी कुटुंबीय उपस्थित होते.