मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वायरी भूतनाथ मोरेश्वर वाडितील श्री. विक्रम तोडणकर यांच्या घराला, काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली. श्री. विक्रम तोडणकर यांचे घर शाॅर्ट सर्किट मुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
त्यानंतर या कुटुंबियांविषयी सामाजिक बांधिलकी जपत, त्यांच्या मदतीसाठी म्हणून मातृत्व आधार फाऊंडेशन, मालवण यांचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे व तसेच सदस्य यांनी ‘आपली सामाजिक बांधिलकी म्हणून रुपये १००’ अशी मदतीची आवाहन हाक दिली होती त्यानुसार मातृत्व आधार फाऊंडेशनच्या सदस्यांनी एकूण ११, १०० रुपयांची एकत्रित मदत जमा केली.
आज १९ जून रोजी सकाळीं ११.३० वाजता, मातृत्व आधार फाऊंडेशन, मालवण या सामाजिक संस्थेने वायरी मोरेश्वर वाडी येथील श्री. विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या घरी भेट दिली आणि मदतीची रक्कम विक्रम तोडणकर यांच्या मातोश्री गिरीजी तोडणकर यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, सौ. फॅनी फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, निशाकांत तोडणकर, सौ. उन्नती तोडणकर, सौ. नेहा तोडणकर, सचिन आडकर हे उपस्थीत होते.
मातृत्व आधार फाऊंडेशनचा संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लुडबे यांनी या दातृत्वशील सदस्यांचे आभार मानले.