समुपदेशक व वैद्यकीय तज्ञांनी केले मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकताच ‘राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम’ व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, आरोग्य जागृती कार्यक्रम संपन्न झाला.
३१ मे दिवशी ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे आयोजीत या कार्यक्रमात उपस्थित रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, डॉ. यसुमित मोंडकर, डॉ भार्वी आवळे, आरोग्य निरीक्षक वि. पी. यशवंत, समुपदेशक उमेश पेडणेकर, स्टाफ नर्स शितल तेली यांनी तंबाखू सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम व कर्करोग याविषयी मार्गदर्शन केले. स्टाफ नर्स शितल तेली यांनी रूग्णांची मौखिक तपासणी केली.
६ महिन्यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर, ज्या रुग्णांनी तंबाखू सेवन न केल्याचे निदर्शनास आले अशा तंबाखू मुक्त रुग्णांचा वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.