ब्युरो न्यूज | विवेक परब : भारतीय जनता पक्ष वेंगुर्लेतर्फे आयोजीत दिपावली सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेत वडखोल (वेंगुर्ले)येथील योगेश नंदकिशोर पालव यांच्या आकाशकंदीलाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
भाजपने आयोजित केलेल्या ‘दिप:ज्योती नमोस्तुते वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव 202’,अंतर्गत येथील श्री रामेश्वर मंदिरात घेण्यात आलेल्या या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. द्वितीय क्रमांक अणसूर येथील प्रमोद सदाशिव गावडे, तृतीय क्रमांक दाभोसवाडा वेंगुर्ला येथील राजाराम सदाशिव लोणे तर उत्तेजनार्थ पारितोषिक आनंदवाडी येथील मयुरेश सुरेश जाधव व गाडीअड्डा येशील यशोदा सुदेश वेंगुर्लेकर यांनी प्राप्त केले. या स्पर्धेसाठी रोख 2000, 1500, 1000 व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी 500 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे परीक्षण जे जे आर्ट स्कूलचे निवृत्त प्रा. सुनील नांदोस्कर यांनी केले.
स्पर्धेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, सुनील नांदोस्कर, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर , रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी रविंद्र परब , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , महिला मोर्चाच्या रसीका मठकर , बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, नितीश कुडतरकर ,छोटु कुबल ,संजय पाटील, महेंद्र मातोंडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी केले.
सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन.