23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

दोन दशकांनंतर भेटले श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे शाळेचे सवंगडी ; माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणेच्या २००० दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा २० वर्षांनंतर नंतर दहावीच्या वर्ग खोलीत पुन्हा एकदा बाकांवर बसून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गेट – टुगेदर म्हणजे स्नेह मेळावा साजरा केला. सर्व शालेय बालमित्र मैत्रिणींनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी आपल्याला गुरुवर्यांनी कशाप्रकारे घडवले आणि आज आपण कुठपर्यंत आहोत याबद्दल भावना व्यक्त करत सर्वांनीच शिक्षकांच्या सहवासात दिवस घालवत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मुख्याध्यापक श्री देसाई व इतर सहकारी शिक्षक यांनी देखील २००४ च्या दहावीच्या वर्गात त्यावेळी आणि आजही कोणत्या प्रकारे काम चालते हे मनोगता द्वारे सांगितले. तसेच विद्यार्थी घडवणे हेच आमचे ध्येय असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेशी आपली नाळ कायमच जोडून ठेवावी असे मुख्याध्यापकाने सांगितले तर हा ओठवणे शाळेतील पहिला स्नेह मेळावा असून या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे श्री कांबळे सर ,राऊळ सर धोंगडे सर, सावंत मॅडम यांनी मनोगतामध्ये कथन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांपैकी २००४ च्या बॅचचे सुमारे २५ विद्यार्थी आज उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणेच्या २००० दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा २० वर्षांनंतर नंतर दहावीच्या वर्ग खोलीत पुन्हा एकदा बाकांवर बसून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गेट - टुगेदर म्हणजे स्नेह मेळावा साजरा केला. सर्व शालेय बालमित्र मैत्रिणींनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी आपल्याला गुरुवर्यांनी कशाप्रकारे घडवले आणि आज आपण कुठपर्यंत आहोत याबद्दल भावना व्यक्त करत सर्वांनीच शिक्षकांच्या सहवासात दिवस घालवत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मुख्याध्यापक श्री देसाई व इतर सहकारी शिक्षक यांनी देखील २००४ च्या दहावीच्या वर्गात त्यावेळी आणि आजही कोणत्या प्रकारे काम चालते हे मनोगता द्वारे सांगितले. तसेच विद्यार्थी घडवणे हेच आमचे ध्येय असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेशी आपली नाळ कायमच जोडून ठेवावी असे मुख्याध्यापकाने सांगितले तर हा ओठवणे शाळेतील पहिला स्नेह मेळावा असून या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे श्री कांबळे सर ,राऊळ सर धोंगडे सर, सावंत मॅडम यांनी मनोगतामध्ये कथन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांपैकी २००४ च्या बॅचचे सुमारे २५ विद्यार्थी आज उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!