26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मतदार ओळखपत्र नसल्यास आवश्यक कागदपत्रांची जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. किशोर तावडे यांनी दिली माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी जिल्ह्यामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील, जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करुन शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.

आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यापैकी कागदपत्रे आवश्यक असतील अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी जिल्ह्यामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील, जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करुन शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.

आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यापैकी कागदपत्रे आवश्यक असतील अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!