मसुरे | प्रतिनिधी : दर्पणचे प्रेरणास्थान, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १० एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझा कदम आयकेअर सेंटर येथे सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४५ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सल्लागार नितीन कदम यांचे हस्ते झाले. यावेळी माजी अध्यक्ष राजेश कदम, प्रा.डाॅ.सोमनाथ कदम, संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे,उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सरचिटणीस सुभाष कदम, श्रीधर तांबे, निलम उत्तम पवार ,रुपेश गरूड ,सुगंध तांबे, गिल्बर्ट फर्नांडिस, प्रकाश बुचडे, विनायक जाधव, प्रशांत बोभाटे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तपेढी विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ.निकिता आत्राम, अधिपरिचारिका प्रांजली परब, लॅब टेक्निशियन मयुरी शिंदे, कांचन परब, परिचर प्रथमेश घाडी आदी रक्तपेढी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नितीन कदम यांनी संस्थेच्या समाजाभिमुख आणि रुग्णांसाठी अत्यावश्यक रक्तदानासारख्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या सामाजिक कार्याला सदिच्छा दिल्या. प्रा.डाॅ. सोमनाथ कदम यांनी स्मृतीशेष उत्तम पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक कार्याला जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.
संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी संस्थेच्या रक्तदान शिबीराला सहकार्य केलेल्या रक्तदात्यांचे, हितचिंतकांचे आभार मानले. सूत्रसंचालन नरेंद्र तांबे यांनी केले. तर रक्तदान शिबिराचे प्रास्ताविक सुभाष कदम यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजक राजेश कदम यांनी स्वीकारल्या बद्दल संस्थेने आभार मानले.