23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

व्हेल माशाच्या उलटी ( एंबरग्रीस) संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा : भाजपा मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर.

- Advertisement -
- Advertisement -

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचीही दिली माहिती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमारांचा नाहक छळ होत असल्याचे सांगत या विषयी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयतांना सांगली – मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची ( १९ किलो) उलटी संशयीतांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयित यांची एक मोठी यादी सांगली – मिरज पोलिसांनी बनवली आहे अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. या तपासा दरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याची वृत्त हाती आली आहे असे रविकिरण तोरसकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे. संबंधित विषयात पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे असा आरोपही तोरसकर यांनी केला आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेल यांनी घेतली असून आज होणाऱ्या कुडाळ येथील बैठकीत सदर विषयात पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्याकडे या विषयात लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. मच्छिमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे या प्रसिद्धी पत्रात भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचीही दिली माहिती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमारांचा नाहक छळ होत असल्याचे सांगत या विषयी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयतांना सांगली - मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची ( १९ किलो) उलटी संशयीतांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयित यांची एक मोठी यादी सांगली - मिरज पोलिसांनी बनवली आहे अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. या तपासा दरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याची वृत्त हाती आली आहे असे रविकिरण तोरसकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे. संबंधित विषयात पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे असा आरोपही तोरसकर यांनी केला आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेल यांनी घेतली असून आज होणाऱ्या कुडाळ येथील बैठकीत सदर विषयात पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्याकडे या विषयात लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. मच्छिमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे या प्रसिद्धी पत्रात भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!