29.1 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

दर्पण महिला फ्रंट आयोजित महिला मेळावा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : आजच्या महिलांनी राजमाता जिजाऊ, जय सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांचा आदर्श घेतला पाहिजे. सर्वात प्रथम स्त्री समानतेचा संदेश गौतम बुद्धांनी स्त्रियांना भिकुनी होण्याचा अधिकार देऊन केला. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या दांपत्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या जुलूम यातना सहन करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असे प्रतिपादन प्रा. पूनम कदम यांनी केले. नुकत्याच संपन्न झालेल्या दर्पण महिला फ्रंट मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, स्नेहल तांबे, उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, प्रज्ञा कदम, ज्योती कदम, संजना तांबे, व्ही.जी कदम ,अनिल तांबे,नेहा कदम,आदी मान्यवर उपस्थित होते. फुले दांपत्यानी स्त्रियांचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मनुस्मृती ज्यामध्ये स्त्रियांसाठी जाचक बंधने होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी दहन करून खऱ्या अर्थाने स्त्रियांना मुक्त केले. तसेच संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांचे हक्क अधिकार अबाधित कसे राहतील याची व्यवस्था केली. आजची शिक्षण व्यवस्था आणि त्यातून मिळणारे शिक्षण याची व्याख्या सावित्रीबाई फुलें आणि डॉक्टर आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या शिक्षणापेक्षा खूप वेगळे आहे. आज समाजाला टीव्ही मालिका मोबाईलवर मिळणारा फ्री अनलिमिटेड डेटा यामध्ये गुंतवून ठेवून आपल्या मूलभूत समस्यांची जाणीव होऊ न देणे हे षडयंत्र रचले जात आहे. आजची सामाजिक आणि राजकीय वाटचाल पाहिली तर संविधान आणि स्त्रियांना संविधानातून मिळालेले अधिकार भविष्य काळामध्येअबाधित राहणार आहेत का हा विचार करणे ही काळाची गरज आहे.

ज्योती कदम म्हणाल्या की शारीरिक आरोग्य आणि जीवन याचा समतोल राखताना आहाराचे नियोजन महत्त्वाचे आहे. बाल्यावस्था ते प्रौढावस्था या काळामध्ये होणारे शारीरिक बदल, वेगवेगळे आजार , त्यासाठी व्यायाम या बाबींची माहिती दिली. खजिनदार नेहा कदम,दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा स्नेहल तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवंतिका तांबे, सूत्रसंचालन आणि आभार सुप्रिया तांबे यांनी केले.
यावेळी रसिका कदम, सुचिता कदम,नीलम तांबे, पल्लवी कदम, संगीता कदम, आकांक्षा तांबे, अनुष्का तांबे, नुतन तांबे,नेहा कदम आणि अनेक महिला या मेळाव्यला उपस्थित होत्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!