26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंबेरीतील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ चे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी गांवातील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ अंतर्गत, ८ मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

८ मार्चला सकाळी ८ वाजता श्री गणपती पूजन व लघुरुद्र, सकाळी १० वाजता जैन सकलेश्वर देवाची पूजा, १०:३० वाजता ग्रामस्थ भाविकांचा एकादशणी अभिषेक, १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता वरद शंकर पूजा असे धार्मिक विधी संपन्न होतील. त्यानंतर श्री अक्षय परब ( मुंबई ) आणि श्री रवी परब ( उपसरपंच, आंबेरी ग्रामपंचायत) पुरस्कृत शालेय मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता सुस्वर भजने सादर केली जाणार असून रात्री ८ वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ नेरूर, असरोंडी यांचा अमृतगंगा हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. ८ मार्चला या सर्व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव जैन सकलेश्वर मंदिर, आंबेरी येथील महाशिवरात्रोत्सव आयोजक ग्रामस्थांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी गांवातील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ अंतर्गत, ८ मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

८ मार्चला सकाळी ८ वाजता श्री गणपती पूजन व लघुरुद्र, सकाळी १० वाजता जैन सकलेश्वर देवाची पूजा, १०:३० वाजता ग्रामस्थ भाविकांचा एकादशणी अभिषेक, १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता वरद शंकर पूजा असे धार्मिक विधी संपन्न होतील. त्यानंतर श्री अक्षय परब ( मुंबई ) आणि श्री रवी परब ( उपसरपंच, आंबेरी ग्रामपंचायत) पुरस्कृत शालेय मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता सुस्वर भजने सादर केली जाणार असून रात्री ८ वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ नेरूर, असरोंडी यांचा अमृतगंगा हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. ८ मार्चला या सर्व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव जैन सकलेश्वर मंदिर, आंबेरी येथील महाशिवरात्रोत्सव आयोजक ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!