25.4 C
Mālvan
Thursday, February 13, 2025
IMG-20240531-WA0007

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आंगणेवाडीत प्रतिपादन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सव २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी भेट दिली. कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसेच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचे संकट दूर कर असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी देवी चरणी मागितले.

कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझं सौभाग्य की मला आई भरडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे, शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई – सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे तसेच आंगणे कुटुंबीय व भराडी देवी देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सव २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी भेट दिली. कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसेच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचे संकट दूर कर असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी देवी चरणी मागितले.

कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझं सौभाग्य की मला आई भरडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे, शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई - गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई - सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे तसेच आंगणे कुटुंबीय व भराडी देवी देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!