मसुरे | प्रतिनिधी : श्री डोंबिवली मित्र मंडळाच्या शाह जयेश मोनजी न्यू सेकंडरी इंग्लिश स्कूल संलग्न श्रीमती देवकाबेन कल्याणजी विरजी छेडा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान आणि मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान (मुंबई विद्यापीठाशी संलग्न- NAAC ‘B’ ग्रेड) यांचा वार्षिक स्नेहसमेलन सोहळा नुकताच डोंबिवली सावित्री बाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे झाला. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी नंदनवार आणि कनिष्ठ महाविद्यालयच्या प्राचार्या सौ. शोभा उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या सोहळ्यात महाविद्यालयाने वार्षिक पारितोषिक वितरणाचे आयोजन केले होते, शैक्षणिक, सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर आणि विशेष पुरस्कार कामगिरीचा आढावा सादर केला .
या कार्यक्रमात मनमोहक नृत्य सादरीकरण, मंत्रमुग्ध करणारे गणेश वंदना नृत्य आणि टिफनी ब्रारच्या प्रेरणादायी जीवनाची हृदयस्पर्शी कहाणी यांचा समावेश होता. कार्यक्रमात किन्नरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे हृदय स्पर्शी संगीत नाट्य , देशभक्तीच्या भावने सोबत , दशावतार नृत्याने भगवान विष्णूचे दहा अवतार प्रदर्शित केले, प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे महत्त्व सिद्ध करत आणि प्रतीकात्मकता याचा सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करून, लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर दिलखेचक नृत्याविष्कारच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमा ची सांगता झाली.