मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेच्या वतीने मालवण शहरातल्या मेढा येथील श्री राम मंदिर येथे उद्या अयोध्येतील श्री राम मंदिरात होणार्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाआरती आणि तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण मनसेचे माजी शहराध्यक्ष यांनी याविषयी माहिती देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रेरणादायी ज्वलंत विचार नेतृत्व तसेच मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या चैतन्यदायी मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे. उद्या २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व मालवण वासिय, श्री राम उपासक यांनी मेढा येथील श्री राम मंदिर येथे उपस्थित रहावे असे सात्विक आवाहन सर्व मनसैनिक, मनविसे, आजी माजी पदाधिकारी, महिला सदस्य यांच्या वतीने श्री विशाल ओटवणेकर यांनी केले आहे. प्रभू श्रीराम हे समस्त मानव व हिंदू धर्म यांची सचेतन जाणिवेची ज्योत असून त्यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सर्वांनी मिळून समर्पित केलेली श्री राम महाआरती ही मावनेतेच्या कल्याणासाठीच असेल असेही प्रतिपादन त्यांनी केले.