मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे मानकरी श्री श्री प्रकाश तथा अण्णा कापडी यांचा काल १४ जानेवारीला गांवच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधत सन्मान करण्यात आला. गेली अनेक वर्षे आई जयंती देवीची पूजा स्वरुपात सेवा ते अथक करत आहेत व मानकरी आहेत तरीही या सर्वांपलीकडे सलग ४ त्यांनी त्यांची सेवा त्यांनी प्रामाणिकपणे अगदी कोणालाही तक्रारीला वाव न देता पार पाडली. देवळाचे आर्थिक व्यवहार, देवस्थानासाठी सढळ हाताने मदत अशा कामांत श्री अण्णा कापडी यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मंदिर परिसरातील बहुतांश कामात त्यांची मदत असते. आई जयंती देवीच्या कृपेने श्री कापडी यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळो हीच सद्भावना व मनोकामना व्यक्त करुन
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश परब, उपाध्यक्ष श्री . मधुकर कदम यांनी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देत त्यांचा सन्मान केला.
यावेळी मानकरी बबन पुजारे , सुरेश पुजारे , बाळा पुजारे अमित पुजारे ,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री . रमेश परब , उपाध्यक्ष श्री.मधुकर कदम , चंद्रकांत गोलतकर , रमेश मुणगेकर , वैभव परब सरपंच महेश वरक , जयंतीदेवी सास्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत . अक्षय परब बारापाच मानकरी ग्रामस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सांगता श्री. प्रमोद सावंत यांनी केली.