मसुरे | प्रतिनिधी : श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर मसुरे मर्डेवाडी येथे आज ०७ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी पूजन झाल्यानंतर,
रात्रौ ९.०० वा.श्री देव दत्त प्रासादिक भजन मंडळ, गडघेरा यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ११.०० वा. श्री देव विठ्ठल रखुमाई ची पालखी, रात्री १२.०० वा. श्री. निलेश गोरे प्रस्तुत महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘कालिया मर्दन’ हा दशावतार प्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.