ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी , गजानन राणे व विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब हे उद्या मंगळवारी २ जानेवारी व बुधवारी ३ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले असून सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील अनेक नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन व राज्यातील बरबटलेल्या राजकीय वातावरणाला कंटाळून राजकारणापासून दोन हात लांब असलेला तरुण वर्ग आता मनसेचा झेंडा खांद्यावर घेत असून या सर्व नव्या दमाच्या तरुणांना एकत्र करून मनसेची पुढील वाटचाल दमदारपणे सुरू राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. संदीप दळवी यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल : मंगळवार दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता दोडामार्ग तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांची बैठक, दुपारी ३:३० वाजता डेगवे येथे पक्ष प्रवेश , सायंकाळी ४:३० वाजता फुकेरी येथे पक्ष प्रवेश व कार्यकर्त्यांसोबत बैठक , सायंकाळी ६ वाजता रोणापाल येथे पक्ष प्रवेश.
बुधवार दिनांक ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता सावंतवाडी हॉटेल मँगो २ येथे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक व नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या , दुपारी १२: ३० वाजता मळगाव येथे पक्ष प्रवेश, सायंकाळी ७ वाजता आरोस येथे आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, यांच्या विद्या विहार इंग्लिश स्कूल आणि कानिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचे उद्घाटन मनसे सरचिटणीस
संदीप दळवी याच्या हस्ते होईल.