27.7 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचे ५६ भोग अर्पण..!

- Advertisement -
- Advertisement -

श्री दत्तजयंती ब्रम्ह मुहूर्तावर पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम.

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंतीच्या ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचे ५६ भोग नैवेद्य पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अर्पण करण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा संपन्न झाली. पुरोहीत व्यंकटेश पुजारी यांनी श्रीना हा नैवेद्य अर्पण केला. श्री नैवेद्यनंतर उपस्थित ६५०० भक्तांना सदर सर्व फळे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हा उपक्रम पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने स्वामीभक्त अजय उर्फ नारायणदास महाराज, गणेश बारटक्के, स्थानिक स्वामीभक्त सुधीर माळशेट्टी यांच्या विशेष परिश्रमासह सेवासार संघाच्या ३० सेवेकऱ्यांच्या परिश्रमातून संपन्न झाला. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, सुधीर माळशेट्टी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, सचिन हन्नुरे, जयप्रकाश तोळणुरे, ऋषिकेश लोणारी, आदीसह अन्य स्वामी भक्त उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री दत्तजयंती ब्रम्ह मुहूर्तावर पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम.

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंतीच्या ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचे ५६ भोग नैवेद्य पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अर्पण करण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा संपन्न झाली. पुरोहीत व्यंकटेश पुजारी यांनी श्रीना हा नैवेद्य अर्पण केला. श्री नैवेद्यनंतर उपस्थित ६५०० भक्तांना सदर सर्व फळे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हा उपक्रम पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने स्वामीभक्त अजय उर्फ नारायणदास महाराज, गणेश बारटक्के, स्थानिक स्वामीभक्त सुधीर माळशेट्टी यांच्या विशेष परिश्रमासह सेवासार संघाच्या ३० सेवेकऱ्यांच्या परिश्रमातून संपन्न झाला. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, सुधीर माळशेट्टी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, सचिन हन्नुरे, जयप्रकाश तोळणुरे, ऋषिकेश लोणारी, आदीसह अन्य स्वामी भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!