29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत अपक्ष नगरसेवक नीरज घाडी भाजपात प्रवेश.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब :देवगड जामसंडे नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक नीरज घाडी यांनी नुकताच केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘काही नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार’, असे वृत्त होते. नगरसेवक नीरज घाडी यांच्या नावाचीही चर्चा होती.मात्र नगरसेवक नीरज घाडी यांनी भाजप प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नगरसेवक नीरज घाडी यांची त्यांच्या प्रभागात चांगली पकड असून भविष्यात भाजपला फायदा होणार आहे, नगरसेवक नीरज घाडी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात.
आमदार नितेश राणे केवळ बोलून न दाखवता जनसेवा करून दाखवतात देवगड शहरात जनतेला काय गरजेचे आहे, हे फक्त आमदार नितेश राणे यांनी ओळखले आहे.देवगड च्या पर्यटनाला आमदार नितेश राणे यांच्या मुळे चालना मिळाली आहे,आमदार नितेश राणे करून दाखवणारे नेतृत्व आहे त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे नगरसेवक नीरज घाडी यांनी सांगितले आहे. यावेळी सिंधुदुर्ग भाजप चिटणीस आरिफ बगदादी, जिल्हा सदस्य संदीप साटम,शरद ठुकरुल,देवगड उपसभापती रविंद्र तिर्लोटकर,शैलेश लोके,उत्तम बिर्जे,आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब :देवगड जामसंडे नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक नीरज घाडी यांनी नुकताच केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी 'काही नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार', असे वृत्त होते. नगरसेवक नीरज घाडी यांच्या नावाचीही चर्चा होती.मात्र नगरसेवक नीरज घाडी यांनी भाजप प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नगरसेवक नीरज घाडी यांची त्यांच्या प्रभागात चांगली पकड असून भविष्यात भाजपला फायदा होणार आहे, नगरसेवक नीरज घाडी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात.
आमदार नितेश राणे केवळ बोलून न दाखवता जनसेवा करून दाखवतात देवगड शहरात जनतेला काय गरजेचे आहे, हे फक्त आमदार नितेश राणे यांनी ओळखले आहे.देवगड च्या पर्यटनाला आमदार नितेश राणे यांच्या मुळे चालना मिळाली आहे,आमदार नितेश राणे करून दाखवणारे नेतृत्व आहे त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे नगरसेवक नीरज घाडी यांनी सांगितले आहे. यावेळी सिंधुदुर्ग भाजप चिटणीस आरिफ बगदादी, जिल्हा सदस्य संदीप साटम,शरद ठुकरुल,देवगड उपसभापती रविंद्र तिर्लोटकर,शैलेश लोके,उत्तम बिर्जे,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!