मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालडी येथील माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतीच मालडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव नारायण मंदिरास भेट दिली. या भेटीदरम्यान येथील ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तथा प्रमुख मानकरी श्री बाबा गावकर यांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की गावच्या विकासात्मक प्रश्नांबाबत भारतीय जनता पक्ष आणि आपण वेळोवेळी सहकार्य करणार. येथील समस्या निवारण करण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत आहोत. यावेळी येथील महिला बचत गटाच्या वतीने तसेच मालाडी ग्रामपंचायत सरपंच पूर्वा फणसगावकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षता मालोंडकर, अनुष्का परब यांनी निलेश राणे यांना विकासात्मक कामांबाबत आणि येथील बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी सहाय्य करण्यासंदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी रोजगार निर्मितीसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन माजी खासदार निलेश राणे यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा गावकर, बाबा परब, महेश मांजरेकर, छोटू ठाकूर, माजी उपसरपंच जितेंद्र परब, धनंजय परब, महेश बागवे, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, मालडी सरपंच पूर्वा फणसगावकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षता मालोंडकर, अनुष्का परब, उपसरपंच आप्पा चव्हाण, सुभाष घाडीगावकर, दाजी परब, भाई घाडीगावकर, बाळा सुभेदार, रवींद्र घाडीगावकर, अरुण घाडीगावकर, आबा घाडीगावकर, सोहम देवळी, हर्षद घाडीगावकर, साई परब, मकरंद कुंटे, मुरारी घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, दिलीप परब, रामचंद्र घाडीगावकर आणि मालडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र परब यांनी केले.