23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आवरा त्यांना आणि आता जास्त अंत बघू नका नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल ; मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये, व्यवसायांमध्ये, स्थानिकांच्या पोटा पाण्याच्या साधनांमध्ये घुसखोरी करणार्या परप्रांतीयांच्या विरोधात स्पष्ट इशारा दिला आहे.

मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात म्हणले की अवैधरित्या घुसखोरी करून तसेच योग्य ओळख पुरावे न देता राजरोसपणे नोकरी व धंदे करणार्या परप्रांतीयांचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त होईल अशी अपेक्षा आहे परंतु तसे न झाल्यास मनसैनिकांना रस्त्यावर उतरून कार्यवाही सुरू करावी लागेल. आता केवळ इशारा व शब्द कमी पडू लागले आहेत त्यामुळे अशा परप्रांतीयांच्या डोक्यावर ‘आशिर्वाद’ ठेवणार्या सर्व शक्तींनी मनसैनिकांच्या संयमाचा अंत बघू नये.

सुजलाम् सुफलाम् व शांततापूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या गैरप्रकारांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मनसे माजी पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी व सदस्य, महिला सदस्य व मालवण मनसे यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लावणार्या व्यक्ती, संघटना व तत्वांना मनसे चांगलाच धडा शिकवेल व बंदोबस्त करेल असा स्पष्ट इशारा माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये, व्यवसायांमध्ये, स्थानिकांच्या पोटा पाण्याच्या साधनांमध्ये घुसखोरी करणार्या परप्रांतीयांच्या विरोधात स्पष्ट इशारा दिला आहे.

मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात म्हणले की अवैधरित्या घुसखोरी करून तसेच योग्य ओळख पुरावे न देता राजरोसपणे नोकरी व धंदे करणार्या परप्रांतीयांचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त होईल अशी अपेक्षा आहे परंतु तसे न झाल्यास मनसैनिकांना रस्त्यावर उतरून कार्यवाही सुरू करावी लागेल. आता केवळ इशारा व शब्द कमी पडू लागले आहेत त्यामुळे अशा परप्रांतीयांच्या डोक्यावर 'आशिर्वाद' ठेवणार्या सर्व शक्तींनी मनसैनिकांच्या संयमाचा अंत बघू नये.

सुजलाम् सुफलाम् व शांततापूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या गैरप्रकारांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मनसे माजी पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी व सदस्य, महिला सदस्य व मालवण मनसे यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लावणार्या व्यक्ती, संघटना व तत्वांना मनसे चांगलाच धडा शिकवेल व बंदोबस्त करेल असा स्पष्ट इशारा माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!