देवेंद्र गावडे | कुडाळ ( उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा येथील नटवर्य कै. बाबी कलिंगण सभागृहामध्ये दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा, देवस्थान उपसमिती नेरूर व रिक्षा युनियन नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजूंना मोफत चष्मावाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच या शिबिरामध्ये मोफत रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, आयुष्मान भारत कार्ड आभा कार्ड कढणे व आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आदि ऑनलाइन सुविधा अत्यल्प फी आकारून पुरवण्यात येणार आहेत.
तरी नेरूर गावामधील जास्ती जास्त ग्रामस्थांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा, देवस्थान उपसमिती नेरूर व रिक्षा युनियन नेरुर यांच्यावीने करण्यात आले आहे.