28.8 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

विद्यार्थ्याचा प्राध्यापकावर चाकू हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -

कमी गुण मिळाल्याच्या रागातून घडलेला प्रकार..!

ब्यूरो न्यूज | मार्डी : परिक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेऊन एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेत ते ३० वर्षीय प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलसमोर सोमवारी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी, अमर सभादिंडे (३०, महादेवखोरी) या सह प्राध्यापकांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विद्यार्थी अर्पित जयवंत देशमुख (२१, रा. सातेगांव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेपासून आरोपी अर्पित हा अजूनही फरार आहे. चैतन्य गुल्हाने हे मार्डी रोडस्थित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी या महाविद्यालयात प्राध्यापक असून, ते ॲनालिसीस हा विषय शिकवतात. तर अर्पित देशमुख हा त्याच कॉलेजमध्ये बी फार्मसीच्या अंतिम वर्षाला आहे. अर्पितला कमी गुण मिळाले म्हणून त्याने आपल्या पोटात चाकूने वार केले, असे गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, गुल्हाने यांच्या पोटातील छोट्या व मोठ्या आतडीला गंभीर मार लागल्याने त्यांना खोलवर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कमी गुण मिळाल्याच्या रागातून घडलेला प्रकार..!

ब्यूरो न्यूज | मार्डी : परिक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेऊन एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला चाकुने भोसकल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेत ते ३० वर्षीय प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलसमोर सोमवारी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी, अमर सभादिंडे (३०, महादेवखोरी) या सह प्राध्यापकांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विद्यार्थी अर्पित जयवंत देशमुख (२१, रा. सातेगांव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेपासून आरोपी अर्पित हा अजूनही फरार आहे. चैतन्य गुल्हाने हे मार्डी रोडस्थित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी या महाविद्यालयात प्राध्यापक असून, ते ॲनालिसीस हा विषय शिकवतात. तर अर्पित देशमुख हा त्याच कॉलेजमध्ये बी फार्मसीच्या अंतिम वर्षाला आहे. अर्पितला कमी गुण मिळाले म्हणून त्याने आपल्या पोटात चाकूने वार केले, असे गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, गुल्हाने यांच्या पोटातील छोट्या व मोठ्या आतडीला गंभीर मार लागल्याने त्यांना खोलवर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

error: Content is protected !!