मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी यांनी विरोधकांच्या विविध टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या ‘डिपाॅजीट जप्त होईल’ या वाक्याचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की आचरा हे दैवी आशिर्वादाचे गांव आहे आणि इथे उन्मत्तपणा चालत नाही. तसेच आचरा आमच्या आचरा ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार हे लोकांच्या सुखदुःख समजणारे असून ते वर्चस्व गाजवणारे नाहीत व गाजवणार नाहीत. निवडणुकीनंतर जनतेला शिवसेनेचा ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरपंच व आचरा ग्रामविकास आघाडीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य पहायला मिळतीलच असे मंदार केणी यांनी प्रतिपादन केले.
या पत्रकार परीषदेला मंदार केणी यांच्या सोबत, प्रचार प्रमुख विनायक परब, दिलीप कावले, प्रकाश वराडकर, सदानंद घाडी,पपु परुळेकर,आशु मयेकर, नितीन घाडी,सचिन रेडकर,संजना रेडकर, युगंधरा मोर्जे,शाम घाडी, मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत, भाई कासवकर व आचरा ग्रामविकास आघाडी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासैनिक, महिला आघाडीच्या सदस्य उपस्थित होते.