27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

कुलगुरु डाॅ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचा भव्य सत्कार संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

कासार्डे | निकेत पावसकर : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. केवळ सांगली, सातारा नव्हे तर कोकणही त्यांनी आपल्या कार्याने पिंजून काढले आहे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. धनगर समाज व विविध प्रकारच्या संस्थाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम सातारा येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव वाघमोडे होते. कुलगुरू पुढे म्हणाले की, प्रवीण काकडे यांनी आपली नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीचे दिवशी व वेळ मिळेल तसा सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळ दिले आहे. डोंगर दर्या खोरयातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात आणुन त्यांना सहकार्य केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा विविध मुलांना त्यांनी पुन्हा शिक्षण प्रवाहात आणले. आजही लोक घराच्या बाहेर पडायला मागत नाहीत. मात्र, प्रवीण काकडे सारख्या माणसाचे समाधान वेगळेच आहे. सामाजिक कार्यातून आपले समाधान व्यक्त करतात. त्यामुळे बुद्धिजीवी वर्गासाठी प्रवीण काकडे यांनी आदर्श घालून दिला आहे की बहुजन समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे, बहुजन समाज अंधारात आहे. त्याला प्रकाशाकडे नेण्याचं कामं खरया अर्थाने प्रवीण काकडे करत आहेत त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे.

काकडे यांनी समाजात ग्राऊंड लेव्हलला जाऊन सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रद्धा, बालविवाह, उद्योग या क्षेत्रांत प्रबोधन करुन समाजासाठी योगदान दिले आहे. कोरोना काळात डोंगर दर्या खोरयातील मुलांना पायपीट करत गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा आदर्श घालून दिला असल्याचे मत कुलगुरू यांनी व्यक्त केले.

कोरोना काळ अतिशय भयंकर काळ होता. त्यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सांगली सातारा पुणे या सातही जिल्ह्यातील जंगलातील डोंगरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन शैक्षणिक साहित्य वाटप केले हे योगदान शैक्षणिक चळवळीला बळ देणारे आहे. तरी त्यांचा आदर्श घेऊन समाज बांधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. याप्रसगी डीवायसपी अश्विनी शेंडगे, अर्जुन काळे, उत्तमराव वाघमोडे, सांगली आरटीओ सौरभ दडस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दादासाहेब चोपडे, आण्णासाहेब कारंडे, बिरा लोखंडे, उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, वसंतराव सजगणे, दिपक शिंदे, डॉ किरण कारंडे, अमृत चौगुले, नितीन पुकळे, रमेश गोरड, धनंजय शिंगाडे, घनश्याम काळे, विठ्ठल दडस, बळीराम वीरकर, मोहन करे, आबासो दडस, दिलीप शिरकुळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. एम. डी. दडस यांनी व आभार श्रीकांत दोरगे यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!