
श्री. सोमेश्वर कलामंच तर्फे आयोजीत रणरागिणी सन्मानपत्रानेही झाला गौरव.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका व आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक सौ. फिलोमीना पंडित यांना त्यांच्या गेल्या २७ वर्षांच्या शैक्षणिक तथा सामाजिक योगदानाची विशेष दखल घेऊन बदलापूर येथील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था जनजागृती सेवा समिती यांचा ‘नवदुर्गा’ सन्मान बहाल करण्यात आला आहे.

श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ रोजी रणरागिणींच्या नवरात्रीच्या विशेष मुलाखती संपन्न झाल्या होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिणींचा शोध घेऊन त्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या. हा उपक्रम गेली ३ वर्षे सुरु आहे. यातील सहभागा मार्गदर्शनाबद्दल श्री सोमेश्वर कलामंच यांनीही ‘रणरागिणी’ सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. सौ. फिलोमीना पंडित यांच्यासह सौ. तृप्ती देवरुखकर, सौ. अवंती पंडित, श्रीमती मंगल कामत, सौ. वैशाली जोशी, सौ. दीपा राणे, सौ. मनाली कुडाळकर, सौ. अनन्या पुराणिक यांचाही विशेष सन्मान करण्यात आला आहे.


कोकणातील जमिनी विकल्या जाऊ नयेत व कोकणी माणसाला कोकणात रोजगाराच्या प्राधान्य संधी निर्माण व्हाव्यात यासाठी गेली ५ वर्षे श्री सोमेश्वर कलामंच ही सामाजिक संस्था त्यांचे संस्थापक अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री सहदेव धर्णे यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेत असते व त्यातीलच ‘गराजलो रे गराजलो’ या नाट्य व जागृती चळवळीतील विविध मुलाखती हा भाग आहे.
अभिअनंदन अभिनंदन अभिनंदन