आमदार नितेश राणेंसह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते खारेपाटण चेकपोस्ट येथे बावनकुळे यांच्या स्वागतासाठी होते उपस्थित.
खारेपाटण | प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांनी जंगी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संध्याकाळी ४:४५ ला खारेपाटण येथे दाखल झाले. आमदार नितेश राणे यांनी बावनकुळे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आधीच दाखल झालेले होते. ढोलपथक, फटाके यांच्या आतिषबाजीत हा स्वागत सोहळा दुमदुमला.
या दौ-यात ‘घर चलो अभियान’स विधानसभा ३०० कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार असून बावनकुळे यांचे जल्लोषी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक श्री बाबा परब, कणकवली तालुका अध्यक्ष श्री संतोष कानडे, माजी जि. प .सदस्य श्री रवींद्र जठार, रवींद्र शेट्ये, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, दिलीप तळेकर, रवी पाळेकर, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,भाजप महिला कार्यकर्त्या श्रीम. रत्नप्रभा वळंजू,सौ उज्ज्वला चिके, निशा शेलार, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, कुरगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, नडगिवे सरपंच माधवी मण्यार, माजी सरपंच अमित मांजरेकर, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, इरफान मुल्ला, वायगणी उपसरपंच प्रताप फाटक, खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, वीरेंद्र चिके, खारेपाटण ग्रा.प.सदस्य अमिषा गुरव , किरण कर्ले,आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक सरपंच, उपसरपंच व भाजपा चे कार्यकर्ते पदाधिकारी खारेपाटण चेकपोस्ट येथे दाखल झाले होते.