24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदा जि. प. केंद्रशाळा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे शाळा बंद आंदोलन..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्र. १ च्या ताब्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनावर पालक ठाम असून आज बुधवार सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती काल आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. जोपर्यंत इमारत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी सांगितले की ही इमारत ताब्यात देण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी जागा कमी पडत आहे. यासाठी लागतची सेंट्रल प्रायमरी स्कूलची इमारत शाळेच्या ताब्यात मिळावी असा ठराव घेण्यात आला होता. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरची इमारत तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. मात्र याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर पालकांनी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण विभागाने आंदोलन न छेडण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र प्रशासनाने केवळ कार्यालयामध्ये कागदी घोडे नाचवीण्या व्यतिरिक्त कोणतेच काम केले नसल्याचा आरोप केला. पालकांची शाळा बंद आंदोलन मागे घेण्याची कोणतीही मानसिकता नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला प्रशासनाने न्याय देऊन त्याची तात्काळ ठोस अंमलबजावणी करावी तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला. यावेळी अध्यक्ष रत्नाकर आगलावे, हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, उपाध्यक्ष संपदा सिद्ध्ये, श्रद्धा नार्वेकर, हेमंत दाभोलकर आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!