24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मसुरे ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीची शिक्षक प्रश्नी पंचायत समितीवर धडक ; माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर व इतर जणांच्या आक्रमक पवित्र्या नंतर गटविकास अधिकार्यांनी दिले लेखी आश्वासन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मसुरे केंद्र शाळा येथे केडर प्रमाणे गेले कित्येक महिने २ शिक्षक कमी होते. या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या प्रशालेची शाळा व्यवस्थापन समिती, मसुरे ग्रामस्थ यांनी मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी ११ वाजता मालवण पंचायत समिती येथे जाऊन गट शिक्षणाधिकारी संजय माने तसेच गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे भेट घेतली. शिक्षक प्रश्नी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांचे रूप पाहून अखेर गट विकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी याप्रशालेला मंगळवार पासून शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळताच शाळा व्यवस्थापन समिती आणि मसुरे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच लक्षमी पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, सन्मेष मसुरेकर यांनी आभार व्यक्त केले.

मसुरे केंद्र शाळेला १६० वर्षांची परंपरा असून पहिले ते आठवीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत. या प्रशालेला केडर प्रमाणे ५ शिक्षक मंजूर आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून याप्रशालेत दोन शिक्षक कमी आहेत. नियमा प्रमाणे या प्रशालेत सद्यस्थितीत तीन शिक्षक काम करत होते आणि एक शिक्षक कामगिरी वरती काम करत होता परंतु यातील एक शिक्षक आजारी असल्यामुळे तो सुट्टीवर ती आहे. त्यातच कामगिरी वरती असलेल्या शिक्षकाची पुन्हा मूळ शाळेवरती बदली केल्याचे प्रशासनाकडून आदेश आल्यानंतर याप्रशालेत फक्त सद्यस्थितीत केडर प्रमाणे दोनच शिक्षक उरले होते. एक ते आठ वर्ग आणि दोन शिक्षक त्यात एकूण प्रशालेत ८२ मुले असे समीकरण म्हणजे येथील मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसानच होते. याबाबत मालवण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजय माने यांना येथील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालकांनी दूरध्वनी वरून कल्पना देण्यासाठी दूरध्वनी केले असता शिक्षणाधिकारी संजय माने यांनी कोणाचाच कॉल रिसिव्ह केला नाही. यामुळे पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती. आपल्या होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक ग्रामस्थ यांनी सोमवारी दुपारी अकरा वाजता मालवण पंचायत समिती वरती धडक दिली. प्रारंभी त्यांनी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्याशी चर्चा केली. परंतु यातून काहीही निष्पन्न न झाल्यामुळे या शिष्टमंडळाने मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे कार्यालयात भेट घेऊन शिक्षकांची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने लक्ष्मी पेडणेकर, शितल मसुरकर, बापू मसुरकर, संतोष दौखंडे आणि पालकानी आक्रमक रित्या शिक्षक प्रश्न लावून धरला. जोपर्यंत शिक्षक प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व पालक ठाण मांडून बसणार. तसेच मंगळवारपासून शाळा बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी आप्पासाहेब गुजर यानी शिक्षणाधिकारी श्री. माने यांना कार्यालयात बोलावून वस्तूस्थितीची सर्व कल्पना दिली आणि माने यांना याप्रशालेत एक शिक्षक कामगिरी वरती आणि एक शिक्षक कायमस्वरूपी देण्यासाठी आदेश दिले. दरम्यान गट शिक्षणाधिकारी माने यांनी याबाबत एकच शिक्षकाचे पत्र देऊन कार्यालयातून न सांगता दुसरीकडे कामाला गेले. यावेळी पुन्हा गट शिक्षणाधिकारी श्री माने यांना ग्रामस्थांनी दूरध्वनी केले असता यावेळी सुद्धा माने यांनी या ग्रामस्थांचे कॉल रिसिव्ह केले नाहीत. माने यांच्या कार्यालयात हे शिष्टमंडळ ताटकळत वाट बघत बसले होते. मसुरे ग्रामस्थांचे शिष्ट मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ हे शिक्षक प्रश्नी आक्रमक झालेले असतानाही गट शिक्षणाधिकारी संजय माने कोणालाच न सांगता निघून गेल्यामुळे मसुरे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. लवकरच गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या या पद्धतीबाबत तसेच शैक्षणिक कारभाराबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, शिषण मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अखेर दुपारी दोन वाजता गटशिक्षण अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी या प्रशालेला ग्रामस्थ पालकांच्या मागणीनुसार शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच गटशिक्षण अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या शिष्टमंडळाची दखल घेऊन त्यांना अभिप्रेत असलेला प्रश्न अतिशय सुयोग्यरीत्या सोडविल्याबद्दल कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे लक्ष्मी पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल मसुरकर, माजी अध्यक्ष सन्मेष मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे आणि सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी या शिष्टमंडळात दिनकर दुखंडे, भगवान भोगले, ग्रामपंचायत सदस्य भक्ती भोगले, सीताराम परब, श्री. नंददीपक साटम, ज्योती पेडणेकर, सायली दुखंडे, मयुरी शिंगरे, सुप्रिया मेस्त्री, समिधा गोलतकर, गोपाळ ठाकूर, सौ. शामल आहिर, श्री. सत्यविजय नाटेकर, श्री आंबेरकर, अजिजुर चिस्ती, अनिरुद्ध बागवे, मनोज कुमार पाटील, श्रेया मोरे आदी ग्रामस्थ पालक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!